“अखिल भारतीय बंजारा साहित्य सम्मेलन बाबत”

​*अखिल भारतिय बंजारा साहित्य संमेलन बाबत*

✍ *गोर कैलाश डी.राठोड* तथा समाज बांधव

          ( मुंबई व ठाणे )

    डॉ विजय जाधव सर व प्रा.कृष्णा राठोड यांनीसाहित्य संमेलन संदर्भात  दिलेली माहिती- वजा सुचना गोर बंजारा अभिवृत्ती व अंतःकरणाला पूरक आहे का? असा प्रश्न सामन्यात तयार होणे साहाजिकच आहे.मागील वर्षी  आपल्या नेतृत्वाखाली  संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाबद्दल प्रथमतः आपले अभिनंदन! 

  सर, आपला संपूर्ण आदर बाळगत माझे मत नम्रपणे मांडत आहे. सर, हे बरे झाले की, आपण वकीलपत्र घेवून पुढे आलात आणि आम्हाला प्रतिपक्ष , विरोधक घोषित कले. स्वत: कर्ते सुधारक असल्याची कबूली दिली आणि सर्व अपेक्षात्मक विचार नम्रपणे व्यक्त करणाऱ्या बंजारा बांधवांना सरसकट *आपण कोण?* असे बेधडक विचारले .

     नागपूर येथील संमेलनास विरोध करण्याचा विषय नसून संमेलन हे सर्वमान्य गोर संस्कार व विचारने परिपूर्ण व्हावे या अपेक्षेने व काही गोरहिताच्या अनुशंगाने यशस्वी संमेलन व्हावे या हेतूनेच अपेक्षा व्यक्त केल्या यामध्ये रविराज राठोड  ,प्रा.नेमिचंद चव्हाण,प्रा.दिनेश राठोड. प्रा, संतोष राठोड मुंबई  मा.राजाराम जाधव, व मी स्वतः यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा निरर्थक वाटतात का ?

व त्या कशा ? समजून सांगावे.

     गतवर्षी वाशीम आणि आगामी नागपूर अशा दोन्ही संमेलनात आपण एक साधर्म्य कायम बाळगले आहे. ते असे की आपल्या नापसंतीचे लिखाण, चिंतन कोणी मांडले की , लगेच त्यास प्रतिगामी,

विरोधी अशी बिरुदावली लावणे .    

       सर सर्वच गोर बांधव टवाळी करण्यासाठी पोस्ट करत नाही. उपरोक्त मान्यवरांनी मांडलेल्या सुचनांचा आदरच झाला. आणि आगामी संमेलनाविषयी वाचनात ज्या पोस्ट येत आहेत त्यात टिका करतांना सुद्धा बहुतेक कुणी दृष्टिपथात नाही . बिनबुडाची टिका किंवा टवाळीला आपण उत्तर द्यावे असा कुणी आग्रह करत नाही . आणि करुही नये

तरीही , चिंतनात्मक विचार कुणी नामांकित , प्रसिद्ध , योगदान देणाऱ्या व्यक्तिनेच मांडावेत अशी अटच जेंव्हा आपण घालता तेंव्हा सामान्य पणे विचार करु शकणाऱ्या गोर बांधवांसाठी संवादाची दारेच आपण बंद करता, असा प्रश्न तयार सहज तयार होतो..

    आपण संपूर्ण लिखाणात *काहींना* हा शब्दप्रयोग अविर्भावाने लिहून एकप्रकारे आपल्याच बांधवांची अक्कल मोजण्यात आनंदानुभूती आपण घेता. हे नक्की याठिकाणी व्यक्त होते.

     संयोजकाचा आदर राखून व्यक्त केलेल्या नम्र अपेक्षेला जिव्हाळयाने बंधुतेने संवादात्मक प्रतिउत्तर देण्याएवजी *आपण कोण?* *योगदान (लायकी) काय?* अशी विचारणा करणे यातच आपली गोरप्रित , विचारनामा , दृष्टिकोण स्पष्ट होतो . एवढे मात्र खरे…

       *दुभत्या म्हशीची लाथ सहन करु* अर्थात संमेलना बाबत बोलण्याचा , विचार मांडण्याचा अधिकार पैसा देणाऱ्यांनाच आहे इतरांना नाही . तिकडे प्रा.कृष्णा राठौड आपण रात्री 11 ला whatsapp वर post टाकून सकाळी 12 ला मिंटिंगला देशभरातील बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहण करतात, वारे तुमचा फंडा? अन म्हणतात की, गेल्या काही दिवसापासुन आम्हाला सल्ले देनारे विद्वान असे संबोधले,जसा काही  समाजाचा मालकी हक्क आपणास मिळाले .वारे वा!!! मागच्या संमेलनास मात्र आपण आपलाच सल्ला स्विकारला. कोणत्याही उणिवा  शिल्लक राहू नये यात आपण तत्पर आहातच.

समाजास नेमकी  तिच अपेक्षा आहे भाऊ! 

      कृपया आपण सर्व सामान्य गोर बांधवांच्या सकारात्मक विचार चिंतनाला जिव्हाळयाने वाचावे . विचार , चिंतनाची प्रक्रिया कुण्या नामांकित वा प्रसिद्ध व्यक्तिची गुलाम नसते . तेंव्हा नावडत्या व्यक्तीला प्रतिगामी विरोधक बनविण्याचा छंद न जोपासता विचारांवर चर्चा व्हावी . सर्वसमावेशक , सर्वसंमती , पारदर्शक , गुणवत्तापूर्ण संमेलन अशाच बाबींकडे जाण्यासाठी आपण चर्चा करावी. प्रत्येकांच्या सुचना मागवाव्या व त्याचा आदराने स्विकार करावा. एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करु नये का?सूचना ,अपेक्षा याचे वावडे वाटूच नये . याउलट त्यातून जे जे सकारात्मक ते ते घ्यावे . म्हणजे कुणी कुणाच्या विद्वतेवर प्रश्न करणार नाही ..

 सरजी ..

समाज अगणित डोळ्यांनी आपल्याकडे लक्ष वेधून आहे याचा विसर पडू नये.बाकी काहि नाही..आपल्या कार्यास शुभेच्छा!!!

*सदैव आपलेच अनेक* *गोरभाईसह मी एक.*.

मो.9819973477

One Comment

Leave a Reply