तांडावस्ती अजूनही प्रवाहापासून वंचित राहणे हे शासनाचे अपयश – आ.हरिसिंग राठोड

तांडावस्ती अजूनही प्रवाहापासून वंचित राहणे हे शासनाचे अपयश
– आ.हरिसिंग राठोड

: विधिमंडळात “तांडेसामू चालो” मोहिमेची दखल.

मुंबई :
पुरोगामी महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर ही तांडा मुख्य प्रवाहात आणल्या गेले नाही.हे शासनाचे पूर्णतः अपयश असल्याचे संतप्त सवाल विधानपरिषदेत आ.हरिसिंग राठोड यांनी औचीत्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला.
राज्यात बंजारा , धनगर , पारधी , लमाण , रामोशी , लोहार , गारोडी अशा विविध विमुक्त भटक्या जमातीचे तांडे मोठ्यां प्रमाणात असून आजही संविधानिक हक्कापासून वंचित आहे.
या उपेक्षित असलेल्या तांडयाना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी व तांडा सक्षमीकरण करीता सर्वत्र “तांडेसामू चालो” अर्थात “तांडयाकडे चला” ही लोकचळवळ प्रख्यात साहित्यिक, तांडा सुधारक एकनाथ पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. एक विधायक बदल घडवून आणण्यात ही चळवळ लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे
या मोहिमेची शासनाने दखल घेवून तांडा प्रवाहात आणण्याची मागणी विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात केली.
विमुक्त भटक्या , बंजारा समुदायाच्या इतिहासात विधिमंडळात दखल घेण्यात आलेली “तांडेसामू चालो” ही पहिली चळवळ ठरली आहे.
नागपूर येथील अधिवेशनात देखील या चळवळीचे विदर्भ व मराठवाड्यातील आमदारांनी दखल घेतली होती.परिणामी दलित वस्ती योजनांच्या धर्तीवर महानायक वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेत नव्याने सुधारणात्मक बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. 500 लोकसंख्येच्या तांडावस्तीला रू.10 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे.
आ.हरिसिंग राठोड यांनी शाहू फुले आंबेडकर यांचे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून उल्लेख करतानाच ‘नाईकांचे पुरोगामी महाराष्ट्र’ असे पहिल्यांदा उल्लेख केला.
विमुक्त भटक्या समुदायाचा विधिमंडळातला एक सशक्त आवाज म्हणून आ.हरिसिंग राठोड यांची देशभर ओळख आहे.
तांडा सक्षमीकरणसाठी तांडेसामू चालो अभियानाचा सातत्यपूर्ण शासनाकडे पाठपुरावा सुरू असून अभियान तांडा उत्थानासाठी कटिबद्ध असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला दिली.

गजानन धावजी राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव् – मुंबई, महाराष्ट्र

Leave a Reply