२२ जुलै रोजी अपंग, दिव्यांग कर्मचारी महासंघाची मुंबई उपनगर विभागाची महत्त्वाची बैठक

मुंबई, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य अपंग, दिव्यांग कर्मचारी महासंघ, मुंबई या अपंग दिव्यांग कर्मचारी बांधवांसाठी सतत कार्य करणाऱ्या संघटनेची मुंबई शहर व उपनगर विभागाची महत्त्वाची बैठक दि.२२/७/२०१८ रविवार रोजी सकाळी-११ः०० ते दुपारी २ः०० वाजेपर्यंत बृहन्मुंबई महापालिका शाळा, बांद्रा (प.) मुंबई-५०. येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष-मा.दिगंबरजी घाडगेपाटील, राज्य उपाध्यक्ष-मा.राजेंद्रजी आंधळे, मा.साईनाथजी पवार, मुंबई शहर व उपनगर अध्यक्ष-मा.अशोकराव चव्हाण, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.बैठकीमध्ये अपंग, दिव्यांग कर्मचाऱ्यांना आपल्या विभागात तसेच कार्यालयात भेडसावणार्या अडचणी व समस्या यांसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार असून मुंबई शहर व उपनगर कार्यकारीणी” निवडण्यात येणार आहे.
तरी मुंबई शहर व उपनगर परिसरातील विविध कार्यालयांमधे नोकरी करणाऱ्या सर्व अपंग, दिव्यांग कर्मचारी बांधवांनी व ज्या अपंग, दिव्यांग कर्मचारी बंधु-भगिनी यांना संघटनेमधे कार्य करायची इच्छा आहे. अशा सर्व कर्मचारी बांधवांनी या “अतिशय महत्त्वाच्या बैठकीला” उपस्थित रहावे असे आवाहन महासंघाचे “मुंबई शहर व उपनगर अध्यक्ष मा.अशोकराव चव्हाण 9022234565
मा.संतोष जाधवसर 9029259881
मा.जी.एम पवारसाहेब 9930562909
मा.चतुर गल्हाटे 9221292996
मा.अशोक राठोड 7045079955
मा.सौ.आशा राठोड 8108829323
मा.सौ.नम्रता राठोड 8779395174 यांनी केले आहे.

One Comment

Leave a Reply