बंजारा समाजाला अभिमान वाटेल असे काम करेन -आ.संजय राठोड

कल्याण (प्रतिनिधी) – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांच्या आशिर्वादामुळेच आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्रीपदाची संधी मिळाली. बंजारा समाजाला अभियान वाटेल असे काम आपण करू. समाजाच्या कामासाठी मंत्रालयातील माझ्या कार्यालयाचे दरवाजे नेहमी खुले असतील, अशी ग्वाही महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांनी कल्याणमध्ये दिली.Mantri Sanjay Bhau Rathod

भारतीय बंजारा समाज व कर्मचारी सेवा संस्था व गोर बंजारा समाजातर्फे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या कल्याणमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला होता. याप्रसंगी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, शिवसेना गटनेते रवींद्र पाटील, माजी नगरसेवक जयंती भाईर, अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे कार्याध्यक्ष राजू नाईक, बंजारा टायगर्सचे अध्यक्ष आत्माराम जाधव, बंजारा समाज व कर्मचारी सेवा संस्थेचे महासचिव सुभाष राठोड, संघटक राधेश्याम आडे, महासचिव अंबरसिंग चव्हाण, वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गोविंद राठोड, मुंबई महापालिकेचे सहाय्यक कामगार अधिकारी शेखर राठोड, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक एस.पी.राठोड, भिवंडी महापालिकेचे सहाय्यकआयुक्त सुदाम जाधव, केडीएमचसीचे अधीक्षक प्रभाकर पवार, राजबंजारा साप्ताहिकाचे संपादक रविराज राठोड आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळ संजय राठोड म्हणाले दिग्रस मतदारसंघातून पहिल्यांदा आपण माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात सु ारे 65 हजारांच्या मताधिक्याने विजयी झालो. दुसर्यांदाही मोठय़ा मताधिक्याने समाजाने निवडून दिले यावेळेस अजित पवारांसारखे नेते राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. समाजाच्या कोणत्याही कामासाठी कार्यकर्त्यांनी केव्हावी आपल्याकडे यावे. मंत्री झालो तरी समाजाचा कार्यकर्ता म्हणूनच आपण त्यांचे काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदल राठोड, अमर पवार, विठ्ठल पवार, आत्माराम चव्हाण, अनिल राठोड, संजय राठोड, नीलेश जाधव, विकास पवार यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply